Quantcast
Channel:
Viewing all articles
Browse latest Browse all 3858

‘अंड्या चा फंडा’या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच

$
0
0

लहानपणीचे दिवस प्रत्येकालाच आठवतात,  त्यावेळच्या आठवणींबरोबर  बालमित्र हे सुद्धा जिव्हाळ्याचा विषय असतो. अश्याच दोन जिवलग मिंत्रांच्या मैत्रीवर आधारित असलेला, अध्यास क्रिएशन निर्मिती आणि संतोष शेट्टी दिग्दर्शित ‘अंड्या चा फंडा’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती ती  सी.आय.डी. ह्या प्रसिद्ध मालिकेतील  संपूर्ण टीमसोबतच शिवाजी साटम, दयानंद शेट्टी आणि नरेंद्र गुप्ता  या कलाकारांची.

'Andya Cha Funda'  Marathi Movie Trailer Launch

‘Andya Cha Funda’ Marathi Movie Trailer Launch

प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी यांनी त्याची सहनिर्मिती केली आहे. सी.आय.डी. आणि आहट यांसारख्या मालिकेचे कथालेखन करणारे संतोष शेट्टी हे या सिनेमाद्वारे प्रथमच दिग्दर्शनात पदार्पण करताय .   अनेक वर्ष सिनेसृष्टीपासून दूर राहिलेली अभिनेत्री दीपा चौधरीदेखील या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे यात तिची प्रमुख भूमिका असून, या चित्रपटामार्फत ती पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक करणार आहे.

अथर्व बेडेकर, शुभम परब आणि मृणाल जाधव या तीन बालकलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आपणस पाहायला मिळणार आहे . दिग्दर्शक संतोष शेट्टी यांची कथा असलेल्या या सिनेमाची पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली आहे. लवकरच प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात  दिपा चौधरी, सुशांत शेलार आणि अरुण नलावडे यांची देखील प्रमुख भूमिका असणार आहे.

 

The post ‘अंड्या चा फंडा’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच appeared first on .


Viewing all articles
Browse latest Browse all 3858

Trending Articles