खरी शांभवी म्हणजेच राणी वाड्यामध्ये पोहचली असून खोटी शांभवी तिला सर्जापासून दूर ठेवण्याचे बरेच प्रयत्न करत आहे ‘चाहूल २‘ या मालिकेमध्ये. सर्जाला सत्य पटवून देण्यात राणीला अजूनही यश मिळाले नाही तसेच सर्जाला राणी अजूनही शांभवीच्या तावडीतून सोडवू शकलेली नाही. या सगळ्यामध्ये वाड्यात अजून एक विचित्र गोष्ट घडली आहे ती म्हणजे सर्जा सारखाच दिसणारा दुसऱ्या व्यक्तीचा देखील वाड्याशी संबंध आहे हे सर्जाच्या लक्षात आले आहे ज्याचे नाव साहेबराव आहे.
सर्जाला वाड्यातील एका पेटी मध्ये साहेबरावचा फोटो मिळतो आणि त्याला प्रश्न पडतो कि हा माणूस हुबेहूब माझ्यासारखाच दिसतो पण हा कोण आहे हे त्याला माहिती नसते. साहेबराव आणि सर्जा यांच्या राहणीमानात, त्यांच्या कपड्यात आणि बोलण्याच्या पद्धतीत फरक असला तरी या दोघांचे चेहरे मात्र सारखेच आहेत. साहेबराव वाड्यामध्ये का राहत नाही ? सुरेखा काय लपवत आहे ? हे शोधण्याचा निर्धार करतो. वाड्यामध्ये राणी म्हणजेच खऱ्या शांभवीला देखील साहेबराव बद्दल कळते आणि त्याच्या बद्दलची माहिती मिळत असताना असे देखील कळते कि, त्याने सुरेखा हि आपली पहिली पत्नी असताना दुसऱ्या बाईला घरात आणले होते. हे सगळे जाणून घेण्यासाठी बघा ‘चाहूल २‘ कलर्स मराठीवर सोम ते शनि रात्री १०.३० वा.
The post सर्जाचा चेहराच उलघडणार वाड्यातील रहस्य appeared first on .