Quantcast
Channel:
Viewing all articles
Browse latest Browse all 3854

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेच्या सेटवर लक्ष्मी आणि बाब्याची धम्माल !

$
0
0
Babyaa and Laxmi Image

Babyaa and Laxmi Marathi Serial ‘Laxmi Sadaiv Mangalam’

कलर्स मराठीवरील नुकतीच सुरु झालेली ‘लक्ष्मी सदैव मंगलम्‘ ही मालिका सध्या बरीच चर्चेमध्ये आहे. विशेषकरून प्रेक्षकांन प्रत्येक भागामध्ये दिसणारे गावाचं सौंदर्य आणि मालिकेमधील कलाकार यामुळे. त्या गावामध्ये वाढलेली अवखळ, लाघवी प्रेमळ अशी लक्ष्मी म्हणजे समृद्धी केळकर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. सध्या या मालिकेमध्ये मल्हार म्हणजेच ओमप्रकाश, आर्वी म्हणजेच सुरभी हांडे प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसत आहेत यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. प्रेक्षकांना या व्यतिरिक्त मालिकेमधील अजून एक पात्र आवडत आहे आणि ते म्हणजे बाब्या. बाब्या म्हणजे मालिकेमधील लक्ष्मीचा जीवाभावाचा मित्र.

लक्ष्मी सदैव मंगलम्‘ मालिकेमधील बाब्या… बाब्या म्हणजे वेद आंब्रे. वेद ठाण्याला रहातो आणि सेटवर जमलेल्या गट्टीमुळे तो लक्ष्मी बरोबरच सेटवर येण जाणं करतो. अभ्यास देखील सेटवरच पार पडतो. पण सेटवरील सगळेच याला “चपडचपड” असे बोलावतात. कारण वेदची सेटवर प्रचंड बडबड सुरु असते आणि सगळी बडबड झाल्यानंतर त्याचे असे म्हणणे असते कि, “मी काही बोलतच नाही” अशा या मिश्कील आणि लाघवी स्वभावाच्या वेदने ‘लक्ष्मी सदैव मंगलम्‘ मालिकेच्या सेटवर सगळ्यांचेच मनं जिंकले आहे. लक्ष्मी आणि बाब्याचे पडद्यावर आणि पडद्यामागे खूपच छान जमते जे प्रेक्षकांना मालिकेमध्ये देखील दिसून येते. अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजेच मालिकेमध्ये त्याचा लुक खूपच साधा आहे त्यामुळे पडद्यामागे तो वेगवेगळे लुक्स स्वत:हूनच ट्राय करत असतो जसे स्पाईक्स करणे, चष्मे घालणे.

The post लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेच्या सेटवर लक्ष्मी आणि बाब्याची धम्माल ! appeared first on .


Viewing all articles
Browse latest Browse all 3854

Trending Articles