Quantcast
Channel:
Viewing all articles
Browse latest Browse all 3858

‘आम्ही दोघी’मालिकेत विवेक सांगळे ची प्रमुख भूमिका

$
0
0
Vivek Sangale Actor

‘Vivek Sangle’

आम्ही दोघी‘ ही नवीन मालिका झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे. आम्ही दोघी मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मालिकेत विवेक सांगळे प्रमुख भूमिका साकारत आहेत. या दोन बहिणींचे जीवन बदलून टाकणाऱ्या आदित्य गायकवाडची भूमिका विवेक साकारणार आहे. ‘लव्ह लग्न लोचा‘ या मालिकेनंतर नवीन व्यक्तिरेखा साकारताना पूर्वी साकारलेल्या ‘राघव‘ इतकंच प्रेक्षकांनी ‘आदित्य‘ ला देखील भरभरून प्रेम द्यावं यासाठी विवेक खूप मेहनत करत आहे.

दोन बहिणी आणि त्यांच्या नात्याभोवती फिरणारे कथानक असलेल्या ‘आम्ही दोघी‘ या मालिकेतील विवेकची भूमिका देखील तितकीच सक्षम असणार आहे. मराठी टेलिव्हिजनवर चॉकलेट बॉय म्हणून प्रसिध्द असलेला विवेक साकारत असलेला आदित्यचं पात्र नखरेबाज आहे आणि तो त्याच्या खऱ्या भावना कधीही व्यक्त करत नाही. पेइंग गेस्ट म्हणून त्यांच्या घरात राहायला आलेला हा आदित्य या दोन्ही बहिणींच्या जीवनात काय बदल करेल हे पाहणे मनोरंजक असेल.

The post ‘आम्ही दोघी’ मालिकेत विवेक सांगळे ची प्रमुख भूमिका appeared first on .


Viewing all articles
Browse latest Browse all 3858

Trending Articles