आपल्या संवेदनशील अभिनयाने मंत्रमुग्ध करणाऱ्या स्मिता पाटीलच्या भाचीचे म्हणजेच खान्देश कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या झिल पाटीलचे मराठी सिनेमात पदार्पण होते आहे, अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या मराठी सिनेमातुन झिल पदार्पण करत असून, या सिनेमात तिचा नायक थ्री इडियटमधील सेंटीमीटर अर्थात दुष्यंत वाघ आहे. झिल ही स्मिता पाटील यांची दूरच्या नात्याने भाची असून ती नंदुरबार जिल्यातील शहादा येथील राहणारी आहे.
ओ थ्री शॉपिंग निर्मित, साज इंटरनेटमेंट सहनिर्मित, अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या सिनेमात झिल पाटील, सीमा नावाच्या महिला शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. सिनेमात येण्याबद्दल झिल सांगते की, माझा जन्म खेडेगावात झाला त्यामुळे मला शेतीची आवड आहे, म्हणूनच माझे शिक्षण देखील बीएससी ऍग्री मध्येच झाले आहे. चित्रपट दिग्दर्शक अखिल देसाई यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी मला पाहताच माझी निवड केली, या सिनेमात माझ्या सोबत दुष्यंत वाघ आणि कमलेश सावंत, उदय सबनीस, अनिकेत केळकर, अंशुमन विचारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाचे चित्रीकरण सध्या शहापूर मध्ये सुरू असून लवकरच सिनेमा प्रदर्शित होणार आह.
The post स्मिता पाटीलची भाची झिल पाटील चे मराठी सिनेमात पदार्पण ! appeared first on .