Quantcast
Channel:
Viewing all articles
Browse latest Browse all 3854

रहस्यमय ‘मिरांडा हाऊस’१७ एप्रिलला प्रदर्शित

$
0
0

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक राजेंद्र तालक, आयरिस प्रॉडक्शन निर्मित,’मिरांडा हाऊस’ हा रहस्यमय चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मिलिंद गुणाजी, साईंकित कामत आणि पल्लवी सुभाष यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मराठी आणि कोकणी भाषेत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून यात काहीतरी मोठी गुंतागुंत असणार हे नक्की. त्यामुळे अनेक तर्कवितर्कही काढले जात आहेत.

Marathi Movie Miranda House
Pallavi Subhash, Milind Gunaji, Sainkeet Kamat, Marathi Movie Miranda House

अखेर, ‘मिरांडा हाऊस’चे हे रहस्य येत्या १७ एप्रिल रोजी उलगडणार आहे. इंग्रजी सबटायटलसह हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून मोठ्या विकेंडचे औचित्य साधून हा चित्रपट दोन दिवस आधीच प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले आहे.
या आधी राजेंद्र तालक यांनी ‘सावली’, ‘सावरिया.कॉम’, ‘अ रेनी डे’ यांसारखे पठडीबाहेरचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळेल.

The post रहस्यमय ‘मिरांडा हाऊस’ १७ एप्रिलला प्रदर्शित appeared first on .


Viewing all articles
Browse latest Browse all 3854

Trending Articles