Quantcast
Channel:
Viewing all articles
Browse latest Browse all 3849

‘स्माईल प्लीज’चित्रपटात अभिनेत्री अदिती गोवित्रीकर डॉक्टर भूमिकेत

$
0
0

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. २००९ मध्ये अदितीने संजय जाधव यांच्या ‘रिंगा रिंगा‘ या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आता लवकरच ती विक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज‘ या दुसऱ्या मराठी चित्रपटात झळकणार आहे.

Actress Aditi Govitrikar
Actress Aditi Govitrikar

विक्रम फडणीस आणि अदिती गोवित्रीकर यांची मैत्री खूपच जुनी आहे. आपल्या या मैत्रीबद्दल आणि ही भूमिका कशी मिळाली याबद्दल अदिती सांगते, ”सुरुवातीच्या काळात विक्रम नृत्य दिग्दर्शक होता आणि त्याचे शोज मी आवर्जून पाहायचे. तेव्हापासून आमची मैत्री आहे. ज्यावेळी त्याने ‘हृदयांतर‘ हा चित्रपट केला त्यावेळी मला मनापासून वाटायचे, की भविष्यात त्याच्या चित्रपटाचा भाग व्हावा आणि माझी ही इच्छा लवकरच पूर्ण झाली. त्याने मला त्याच्या ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटासाठी विचारणा केली. चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी अदिती म्हणते, ”या चित्रपटाचे कथानकच मुख्य हिरो आहे. कथानक अतिशय सशक्त असल्याने हा चित्रपट नक्कीच उत्कृष्ट ठरेल. वैयक्तिक आयुष्यात मी डॉक्टर असल्याने पडद्यावरही डॉक्टरची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाल्याने मी खूपच खुश आहे.’
स्माईल प्लीज‘ हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

The post ‘स्माईल प्लीज’ चित्रपटात अभिनेत्री अदिती गोवित्रीकर डॉक्टर भूमिकेत appeared first on .


Viewing all articles
Browse latest Browse all 3849

Trending Articles