
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘फर्जंद‘ चित्रपटाच्या यशानंतर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. ‘फर्जंद‘ नंतर आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा ‘फत्तेशिकस्त’ लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार असून पन्हाळगडावर कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे.
आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त‘ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे.
मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी ‘फत्तेशिकस्त‘च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुळून आली आहे. शिवाय हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी सुद्धा या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

इतिहास हा असा दुवा आहे जो आपल्याला तत्कालीन घटनांशी जोडून ठेवतो, आणि हा दैदिप्यमान इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजरामर पराक्रमाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अशाच एका शिवकालीन रोमांचकारी सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून देणारा ‘फत्तेशिकस्त‘ आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज होतोय.
The post छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा ‘फत्तेशिकस्त’ प्रेक्षकांच्या भेटीस appeared first on .