आदेश बांदेकर यांच्या ‘सोहम प्रोडक्शन’ची निर्मिती असलेली हलकी फुलकी मनोरंजक असलेली ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ हि नवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या मालिकेविषयी बोलताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, “मालिका ‘सुफळ संपूर्ण’ होण्यासाठी सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाची गरज आहे. संपूर्ण टीमवर भरभरून प्रेम करा. प्रत्येकचकुटुंबाला ही कथा आपली वाटेल याची खात्री आम्हाला आहे. ‘सोहम प्रोडक्शन’ने नेहमीच रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. ‘झी युवा’वरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेच्या माध्यमातूनसुद्धा आमचा हाच प्रयत्न असेल. आपलं प्रेम आणि आशीर्वाद सदैव सोबत असतील अशी मी अपेक्षा करतो.”
‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही नवी मालिका १५ जुलैपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता, ‘झी युवा’वर पाहता येईल.
The post झी युवा वाहिनीवर ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही एक अनोखी मालिका appeared first on .