कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रम सुर झाल्यापासून सुरवीर सादर करत असलेली गाण्यांना प्रेक्षकांच्या विशेष पंसतीस पडत आहेत. ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या ‘बालदिन विशेष’ भागानिमित्त मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळ पुन्हा एकदा सूर नवाच्या मंचावर येणार आहे. मॉनिटर सोबतच अंशिका, चैतन्य, सई हे छोटे सुरवीर देखील येणार आहेत. मंचावर थोडी मस्ती, थोडी कल्ला पुन्हा होणार आहे, स्पृहा आणि मॉनिटरची धम्माल मस्ती बघायला मिळणार आहे.

आपल्या सगळ्यांचा लाडका मॉनिटर आता शाळेमध्ये जायला लागला आहे. त्यामुळे त्याचे शाळेतले काही किस्से मस्ती आपल्याला सांगणार आहे तसेच मॉनिटर बम बम बोले हे देखील गाणे सादर करणार आहे. आपल्या सगळ्यांच्याच बालपणीच्या काही आठवणी आहेत ज्या आपण विसरलो नाहीये.महेश काळे आणि अवधूत गुप्ते अश्याच काही आठवणी सांगणार आहेत. बालदिनानिमित्त आलेले छोटे सुरवीर त्यांची काही गाणी सादर करणार आहेत.
तेंव्हा नक्की बघा कलर्स मराठी ह्या वाहिनीवर ‘सूर नवा ध्यास नवा’ चा ‘बालदिन विशेष’ भाग आपल्या लाडक्या मॉनिटरसोबत ह्या आठवड्यामध्ये सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वा.
The post ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या ‘बालदिन विशेष’ भागात गाणार मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळ appeared first on .